पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रामचंद्र धामणस्कर


 भाऊसाहेब १८८८ ला विलायतेतून परत आल्यावर सेटलमेंट ऑफीसर, नवसारी प्रांताचे सुभे, कडी प्रांताचे सुभे अशा नियुक्त्या झाल्या. १८९१ मध्ये त्यांची तपासणी कामदार म्हणून नेमणूक करून बडोदे संस्थानातील बहुतेक खात्याची तपासणी त्यांच्याकडून करून घेतली. त्या दरम्यान बडोदे संस्थानातील एकंदर मुलखी खाती, सरकारी स्पिनींग अँड विविंग मिल, खाजगी खात्यासंबंधीचे हुजूर हुकूम, एकंदर कचेऱ्या आणि खर्च वेच, जवाहीरखाना इ. खात्यांचे तपासणी रिपोर्ट भाऊसाहेबांनी महाराजांना सादर केले. सरसुभेच्या हुद्याचे काम भाऊसाहेबांनी तीन वर्ष केले एवढ्या अवकाशात त्यांना एकदा दिवाण पदावर काम करण्याची संधी मिळाली. पुढे दिवाण बहादुर श्रीनिवास राघव अयंगार हे कायमचे दिवाण पद सोडून गेल्यावर भाऊसाहेबांना ऑक्टोबर १९०१ ला दिवाण पद मिळाले. ते बडोदा संस्थानचे ७ वे दिवाण बनले. धामणस्करांना दिवाण पद मिळाल्यामुळे संस्थानातील व संस्थानाबाहेरील इतर समंजस व्यक्तींना ही नेमणूक योग्यच वाटली. परंतु काही

महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ / १७