Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 फुले-सयाजीराव भेट
 १८८२ मध्ये धामणस्करांनी पुण्यात महाराजा सयाजीराव आणि महात्मा फुले यांची भेट घडवून आणली. १८८३ मध्ये धामणस्करांच्या मध्यस्थीने फुलेंनी बडोद्याला भेट दिली. बडोदावत्सलचे संपादक रामजी संतूजी आवटे आणि धामणस्कर यांनी १८९६ मध्ये बडोद्यात मराठा जातीचे पुरोहित तयार करण्यासाठी माधवराव पवार यांच्या घरी पुरोहित पाठशाळा सुरु केली. पुढे २३ वर्षांनी याच धर्तीवर १९१९ मध्ये कोल्हापूर येथे श्री शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना सत्यशोधक भास्करराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली झाली.
 केळूसकरांचे मार्गदर्शक
 सयाजीरावांनी जेव्हा इंग्रजीतील राष्ट्रकथामालेच्या भाषांतराचे काम हाती घेतले होते. त्यावेळी धामणस्करांच्या शिफारशीवरूनच महाराजांनी कृष्णराव अर्जुन केळूसकर यांना या मालेतील 'फ्रान्सचा जुना इतिहास' या ग्रंथाच्या मराठी अनुवादाचे काम दिले. त्यामुळेच केळूसकरांनी आपल्या आत्मचरित्रात त्यांच्या

केळूसकर
महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ / १९