होते. शाहू महाराजांनी त्यांना न्यायाधीशपदी नेमले होते. सयाजीरावांचे आर्थिक पाठबळ मिळालेल्या डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या शिष्यवृत्तीवर शिकलेल्या ३२ व्यक्ती कोल्हापूर संस्थानात महत्वाच्या पदावर होत्या.
शाहू महाराजांनी १९०१ मध्ये सुरु केलेल्या मराठा बोर्डिंग या पहिल्या वसतिगृहाचे पहिले विद्यार्थी पी. सी. पाटील, मराठा जातीतील पहिले इंजिनिअर दाजीराव अमृतराव विचारे हे कोल्हापूर संस्थानात एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर, शाहू महाराजांच्या मराठा बोर्डिंगच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणारे जिवाजीराव सावंत, शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या क्षात्रजगद्गुरूपीठाचे पहिले जगद्गुरू सदाशिवराव पाटील बेनाडीकर, कोल्हापूर संस्थानातील पहिले मराठा न्यायाधीश खंडेराव बागल हेसुद्धा डेक्कन मराठाच्या शिष्यवृत्तीवर शिकलेले होते. महत्वाचे म्हणजे या सर्व लोकांनी फक्त मराठा जातीसाठी नाही तर सर्व बहुजनांच्या