पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गंगारामभाऊ म्हस्के


जवळ-जवळ सर्वं ज्ञानशाखांतील मराठ्यांमधील पदवीधरांची पहिली पिढी गंगारामभाऊंच्या शिष्यवृत्तीवर शिकलेली होती. इतकेच नव्हे तर बडोदा, ग्वाल्हेर, इंदोर, कोल्हापूर या महत्वाच्या संस्थानांमधील प्रशासनात महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे बहुतेक उच्चशिक्षित मराठे हे गंगारामभाऊंचे बौद्धिक ‘उत्पादन’ होते.

 याचे उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला कोल्हापूरच्या शाहू : महाराजांच्या संस्थानचा विचार करावा लागेल. शाहू महाराजांच्या पुरोगामी धोरणाला कृतीत उतरविणाऱ्या काही व्यक्तींचा या दृष्टीने विचार करता येईल. यामध्ये भास्करराव जाधव हे एक महत्वाचे नाव. भास्करराव जाधवांना १८८८ ते १८९२ अशी पाच वर्षे गंगारामभाऊंची शिष्यवृत्ती होती. या काळात ते मुंबई विद्यापीठातून पदवीधर झाले. त्यांनी कोल्हापुरात सत्यशोधक चळवळ रुजवण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली. १८९८ ते १९२१ अशी २३ वर्षे त्यांनी कोल्हापुरातील सर्व पुरोगामी चळवळींना बौद्धिक नेतृत्व दिले. कोल्हापूर संस्थानातील पहिले मराठा वकील खंडेराव बागल हे डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या शिष्यवृत्तीवर शिकले

महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ / १४