पान:महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराजांनी धर्मखात्याच्या वतीने 'प्राचीन भारतीय संस्कृती आणि तुलनात्मक धर्म' या विषयांवर सार्वजनिक व्याख्यानांच्या आयोजनास सुरुवात केली. १९२८ मध्ये सयाजीरावांनी 'Tribe and Caste Of Bombay' या पुस्तकाचे गोविंद मंगेश कालेलकर यांच्याकडून मराठी भाषांतर करून घेऊन 'मुंबई इलाख्यातील जाती' या नावाने सयाजीसाहित्य मालेत प्रकाशित केले.

 १९२८ मध्येच बडोदा संस्थानकडून प्रकाशित करण्यात आलेला ' A Glossary of Castes, Tribes and Races In The Baroda State' हा ग्रंथदेखील जात साक्षरतेच्या प्रयत्नांचाच भाग होता. या ग्रंथाच्या निर्मितीमागील महाराजांची भूमिका ग्रंथाचे संकलक गोविंदभाई देसाई यांनी स्पष्ट केली आहे. देसाई लिहितात, “His Highness the Maharaja Saheb having been pleased to order that this glossary should be reprinted as a separate publication, this little volume has been issued in the hope that it will prove useful at least for the collection of further interesting information about the various Castes, Tribes and Races in the State. Some additional information regarding Sadhus and Fakirs which did not appear in the original glossary has been added to this publication." सयाजीरावांनी जात साक्षरतेसाठी ग्रंथ प्रकाशनाच्या आणि संशोधनाच्या माध्यमातून दिलेल्या

महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर / ११