पान:महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रोत्साहनाचा हा आढावा आपल्याला नवी दृष्टी देतो. १९०९ मध्ये बडोद्याच्या साहित्य संमेलनातील एक निवड आपल्याला विचारास 'प्रवृत्त करते. १९०९ चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले मुंबईचे के. आर. किर्तीकर हे पहिले ब्राह्मणेत्तर अध्यक्ष होते. कारण या अगोदरचे सर्व अध्यक्ष ब्राह्मण होते. ही किमया सयाजीरावांमुळेच घडून आली.
जातविषयक पथदर्शी संशोधन आणि सयाजीराव
 सयाजीरावांनी जात साक्षरतेसाठी राबवलेल्या महाप्रकल्पाचे प्रमुख लाभार्थी असणाऱ्या ज्ञानकोशकार केतकरांचा जन्म २ फेब्रुवारी १८८४ रोजी मध्यप्रदेशातील रायपूर येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण अमरावतीत झाले. मुंबईमधील विल्सन महाविद्यालयामध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर सयाजीरावांनी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या जोरावर केतकर जातीवरच्या समाजशास्त्रीय संशोधनासाठी अमेरिकेला गेले. ही अमेरिकावारी केतकरांच्या आयुष्याला निर्णायक वळण देणारी ठरली.

 अमेरिकेतील जातीवरील समाजशास्त्रीय संशोधनासाठी सयाजीरावांनी केतकरांना दिलेली शिष्यवृत्ती १९०६ ते १९०९ अशी तीन वर्ष होती. परंतु या तीन वर्षात केतकरांचे संशोधन पूर्ण झाले नाही. केतकरांच्या पीएच. डी. गाईडच्या शिफारशीवरून महाराजांनी प्रशासकीय नियमांना मुरड घालत ही शिष्यवृत्ती एक

महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर / १२