पान:महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गेला.” सयाजीरावांनी पुरवलेल्या खंबीर पाठिब्यामुळे विठ्ठल रामजी शिंदे आपले अस्पृश्यता निवारणासाठीचे संस्थात्मक कार्य उभा करू शकले. त्यामुळेच १९३३ मध्ये विठ्ठल रामजी शिंदेंनी स्वतःचा 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' हा महत्त्वपूर्ण ग्रंथ कृतज्ञतापुर्वक सयाजीरावांना अर्पण केला होता.
बडोद्यात दुसरे व्याख्यान
 डिसेंबर १९२९ मध्ये बडोद्यातील सहविचारिणी सभेने शिंदेंनी बडोद्याला येऊन व्याख्यान द्यावे अशी त्यांना विनंती केली. त्यानुसार रविवार, २९ डिसेंबर १९२९ रोजी सायंकाळी ६ वाजता जयसिंगराव स्टेट लायब्ररीमध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांचे व्याख्यान झाले. हे व्याख्यान 'तौलनिक भाषाशास्त्र' या विषयावर झाले. या व्याख्यानाचा तपशील वर्तमानपत्रातून वाचून महाराणी चिमणाबाई यांनी शिंदेंना भेटीसाठी बोलावले. यावेळी रशियातील कम्युनिझम या विषयावर त्यांच्यात विस्तृत चर्चा झाली. शिंदेच्या आणि चिमणाबाईंच्या भेटीचा हा पहिलाच प्रसंग होता.
 १० जानेवारी १९३० मध्ये सयाजीराव युरोप दौऱ्यावरून परतले होते. यानंतर महाराजांनी शिंदेंना बडोद्यात २-३ व्याख्याने देण्यास सांगितले. त्यानुसार २२ जानेवारी १९३० रोजी लक्ष्मीविलास पॅलेसच्या दरबारहॉलमध्ये ' Study of Universal Religion' या विषयावर शिंदेंचे व्याख्यान झाले. या व्याख्यानासाठी दरबारचे सर्व लहानमोठे अधिकारीदेखील उपस्थित होते.

महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे / २५