पान:महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 धर्म आणि जात चिंतन केंद्रस्थानी ठेवून महाराजा सयाजीराव गायकवाड आणि विठ्ठल रामजी शिंदे यांच्यातील अनुबंध आजपर्यंत तपासले गेले नाहीत. या अनुषंगाने वरील चर्चा विचारात घेता अस्पृश्योद्धाच्या कामात शिंदेंनी फुल्यांच्याही अगोदर सयाजीरावांना का स्थान दिले होते हे लक्षात येईल. विठ्ठल रामजी शिंदेंना सयाजीरावांची प्रेरणा आणि साथसंगत मिळाली नसती तर त्यांच्याकडून अस्पृश्योद्धाराचा राष्ट्रीय कार्यक्रम निर्माण झाला नसता. परिणामी डॉ. आंबेडकरांच्या जातीअंताची चळवळ एवढी गतिमान झाली नसती. थोडक्यात, वरील चर्चेवरून हा निष्कर्ष अपरिहार्यपणे निघतो.

महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे / २६