पान:महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खर्च करून विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल प्रेम दाखवले. स्वतः कष्ट उपसले.' समाजात पडलेली फूट कामी आली. वि. रा. शिंदे यांना निवडणुकीत अपयश आले. मराठा समाजासाठी वणवण करणाऱ्या खासेराव जाधवांना खूप दुःख झाले.
शिंदे आणि कोसंबी
 विठ्ठल रामजी शिंदेंनी अशीच महत्त्वपूर्ण भूमिका धर्मानंद कोसंबी यांच्या आयुष्यामध्ये बजावली. महाराष्ट्रातील बौद्ध धर्म आणि पाली भाषेच्या प्रसारात धर्मानंद कोसंबी यांचे स्थान अनोन्य आहे. कोसंबी १९१२ मध्ये अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये नोकरी करावी अशी विठ्ठल रामजी शिंदे यांची इच्छा होती. शिंदेंनी धर्मानंदांची शिफारस करून फर्ग्युसन कॉलेजचे प्रोफेसर केशवराव कानिटकर यांना पत्रही लिहिले. त्यानंतर कोसंबींनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये पाली भाषेचे प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली. कारण त्यादरम्यान पुण्यात पाली भाषेच्या प्रसारासाठी ही चांगली संधी असल्याने त्यांना शिंदेंची कल्पना आवडली होती. त्यामुळे कोसंबींना ही नोकरी मिळवून देण्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांची महत्त्वाची भूमिका होती हे स्पष्ट आहे. कोसंबींच्या विनंतीवरून १९१२ मध्ये सयाजीरावांनी फर्ग्युसन कॉलेजमधील पाली भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याला १५ रु.च्या २ आणि १० रु. च्या

महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे / १९