पान:महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वीकारली. इथे येताना ते खर्चासाठी रक्कम घेऊनच आले. विठ्ठल रामजी शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजच्या मंडळाची खासेराव जाधव यांच्या अध्यक्षेखाली भवानी पेठेत एक सभा झाली. या सभेत न. चिं. केळकर यांनी भाषण केले. ते म्हणाले, 'माझे आई-वडील शेतकरी होते. आपण मराठा पत्राचे संपादक आहोत म्हणून मराठाच आहे.' केळकरांच्या भाषणांचा वृतांत छत्रपती शाहू महाराजांनी वाचला आणि वि. रा. शिद्यांना लागलीच त्यांनी पत्र लिहिले. आपण पुणे शहरातर्फे निवडून यावे अशा शुभेच्छाही दिल्या. परंतु शाहू महाराजांचे या निवडणुकीत शिंद्यांना साहाय्य मिळाले नाही. मराठा समाजाचे पुण्यातील दोन्ही गट एकत्र यावेत म्हणून खासेराव जाधवांनी खूप प्रयत्न केला; पण एका बैठकीत मराठा मंडळी एक दुसऱ्यावर धावून जाऊ लागली. मारामारी होऊन डोकी फुटली. या भांडणाऱ्या मंडळीपुढे खासेराव हात जोडून म्हणत होते, 'भांडणं आणि आपल्याचं माणसांचे पाय ओढून शत्रू पक्षास मदत करणं हा आपल्या समाजास शेकडो वर्षांचा शाप आहे. आता तरी डोळे उघडा. असे भांडल्याने मतलबी माणसं फायदा घेतात. ' आपल्या जवळच्या माणसाचं भलं होऊ नये, याच विचारांनी मराठा समाज दुभंगत गेला. खासेराव जीवाचे रान करून विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रचारासाठी रात्रंदिवस पुण्यात घरोघर फिरून विनवणी करत होते. खासेराव यांनी मात्र स्वतः हजारो रुपये

महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे / १८