पान:महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराजांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी महाराजांनी शिंदेंना या परिषदेसाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. परंतु याच वेळी पहिले जागतिक महायुद्ध सुरू झाल्याने ही परिषद झाली नाही. २३ व २४ मार्च १९१८ रोजी विठ्ठल रामजी शिंदेंनी मुंबई येथे भरवलेल्या 'दुसऱ्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव होते. या परिषदेत भारतातील पहिला अस्पृश्यता निवारण ठराव मांडला होता. या ठरावावर उपस्थित मान्यवरांपैकी शंभरहून अधिक लोकांनी सह्या केल्या. त्यामध्ये पहिली सही करणारी व्यक्ती सयाजीराव गायकवाड होते.
डिप्रेस्ड क्लासेस मिशन
 विठ्ठल रामजी शिंदेंनी स्थापन केलेल्या 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' या संस्थेचीदेखील सयाजीरावांनी सातत्याने खंबीर 'पाठराखण केली. सप्टेंबर १९०९ मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या पुणे शाखेच्या शाळांच्या बक्षीस समारंभाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलेल्या सयाजीरावांनी या संस्थेला १,००० रु.ची देणगी दिली. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम २७ लाख ७२ हजार रु. हून अधिक भरते. या कार्यक्रमानंतर पुणे येथील महार समाजाचे प्रमुख पुढारी रा. शिवराम जानबा कांबळे व रा. श्रीपतराव थोरात या दोघांना सयाजीरावांनी बडोद्यास खास आमंत्रित केले. बडोदा भेटीवेळी त्यांचा योग्य सत्कार करून राजमहालात सयाजीरावांनी त्यांच्याबरोबर आपल्या टेबलावर

महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे / १५