पान:महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करून १९०० सालापासून पुढे काही वर्षे शाळांतून विद्यार्थ्यांची संख्या १०० पासून १५०० पर्यंत राहील असे केले. एकंदरीत ह्या थोर पुरुषाच्या अंतःकरणात ह्या हतभागी लोकांचा ध्यास सतत लागला होता, हे माझ्या ध्यानात येऊन चुकले. इतकेच नव्हे तर या महत्त्वाच्या विषयासंबंधी माझ्या स्वतःच्या विचारांना नवीन प्रोत्साहन मिळून ब्राह्मोसमाजाच्या अखिल भारतातील माझ्या प्रचारकार्याबरोबर ह्या लोकांची निरनिराळ्या प्रांतातील स्थिती स्वतः डोळ्याने नीट निरखून अजमाविण्याची मला प्रेरणा झाली.” शिंदे यांनी केलेल्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या ऐतिहासिक कार्याची प्रेरणा सयाजीरावच होते याचा पुरावा हे स्वगत देते.
अस्पृश्योद्धार - सयाजीरावांचे भक्कम पाठबळ
 विठ्ठल रामजी शिंदेंच्या अस्पृश्योद्धाराच्या कार्याला सयाजीरावांनी सातत्याने सक्रिय पाठिंबा दिला. १९०४ मध्ये मुंबई येथे भरलेल्या राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात सामाजिक परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव होते. याच परिषदेत रामकृष्ण भांडारकरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या धर्म परिषदेसाठी विठ्ठल रामजी शिंदेंनी सयाजीरावांना निमंत्रित केले होते. १९०९ मध्ये विठ्ठल रामजी शिंदे सेक्रेटरी असणाऱ्या भारतीय एकेश्वरी धर्म परिषदेच्या लाहोर अधिवेशनास सयाजीरावांनी आपला प्रतिनिधी पाठवला होता. १९१४ मध्ये शिंदे जागतिक एकेश्वरवादी धर्म परिषद घेण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी त्यांनी

महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे / १४