पान:महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विषयावरील पहिला मराठी निबंध होता. हा निबंध म्हणजे पुढे शिंदेंच्या 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' (१९३३) या प्रश्नाची समाजशास्त्रीय चर्चा करणाऱ्या मराठीतील पहिल्या ग्रंथाचा पाया होता. दुर्दैवाने महाराजांच्या अन्य कार्याप्रमाणे ही कृतीसुद्धा दुर्लक्षित राहिली.
अस्पृश्योद्धार - पहिले संस्थात्मक काम
 संपूर्ण भारतात सर्वप्रथम विठ्ठल रामजी शिंदेंनी अस्पृश्योद्धाराचे संस्थात्मक काम उभे केले. विशेष म्हणजे बाबासाहेबांच्या अगोदर शिंदेंनी देशपातळीवर सुरू केलेल्या या कार्यामागे सयाजीरावांची प्रेरणा होती. सयाजीरावांनी बडोद्यात अगदी १८८२ पासून सुरू केलेले काम अभ्यासण्याची संधी महर्षी शिंद्यांना १९०३ मध्ये मिळाली. हा अनुभव त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून देणारा ठरला. एका अर्थाने विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनातील हा सर्वांत महत्त्वाचा 'टर्निंग पॉइंट' होता. या संदर्भात शिंदे आपल्या आत्मचरित्रात म्हणतात, “१८९१-९२ साली बडोदा, अमरेली, पाटण आणि नवसारी येथे प्रत्येक ठिकाणी अस्पृश्य मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे काढून त्यांच्या जेवणाची व राहण्याची सोय केली गेली. कपडेलत्ते, पाट्यापेन्सिली वगैरेही पुरविली. ह्यानंतर कित्येक वर्षे ह्या प्रयोगाला दुष्काळ व प्लेग ही विघ्ने आली. ... तरी देखील महाराजांनी खर्चात बचत न करता बडोदे भागात रु. ४० च्या व इतर भागात रु. २५ च्या शिष्यवृत्त्या ठेवल्या व कसेही

महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे / १३