Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाली.” त्यावेळी अस्पृश्य उद्धारासाठी सयाजीरावांनी राबवलेले शैक्षणिक उपक्रम पाहून ते इतके प्रभावित झाले की, ब्राह्मो समाजाच्या कामाबरोबर त्यांनी देशपातळीवर अस्पृश्य उद्धाराची संस्थात्मक चळवळ उभी करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले.
बहिष्कृत भारत - बडोद्यातील भाषण
 पुढे ४ वर्षांनंतर १९०७ मध्ये सयाजीरावांनी बडोद्यात न्यायमंदिराच्या दिवाणखाण्यात विठ्ठल रामजी शिंदेचे 'अस्पृश्योद्धार' या विषयावरील भाषण आयोजित केले होते. ते भाषण 'बहिष्कृत भारत' या मथळ्याखाली 'मनोरंजन' मासिकाच्या डिसेंबर १९०८ च्या अंकात प्रकाशित झाले. पुढे महाराजांच्या आज्ञेने हेच व्याख्यान बहिष्कृत भारत' या स्वतंत्र पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाले. पुढे २० वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'बहिष्कृत भारत' याच नावाचे पाक्षिक १९२७ मध्ये सुरू केले. तर डॉ. आंबेडकरांच्या १९३६ मधील 'Annihilation Of Caste' या जगप्रसिद्ध भाषण- निबंधाची पूर्वतयारी ठरणारा सयाजीरावांचा 'The Depressed Classes' हा ऐतिहासिक इंग्रजी निबंध १९०९ मध्ये 'Indian Review' या मासिकाच्या डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाला होता. त्यावेळी बाबासाहेब पदवीच्या 'दुसऱ्या वर्षात शिकत होते. विठ्ठल रामजी शिंदेंच्या 'बहिष्कृत भारत' या पुस्तिकेच्या एक हजार प्रती महाराजांनी विकत घेऊन बडोद्यात वाटल्या. हा विठ्ठल रामजी शिंदेचा या

महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे / १२