पान:महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असेच मी समजेन." ऋण फेडण्याचा हा अजब प्रकार पाहून दयाळू महाराज हसले आणि म्हणाले, “बरे आहे. शिंदे, तुम्ही यशस्वी होऊन या!” आधीची स्कॉलरशिप देताना घातलेली बडोद्यातील नोकरीविषयीची अट बाजूला ठेवून पुन्हा १,५०० रु. प्रवास खर्च यावेळी महाराजांनी दिला. शिंदे ऑक्सफर्डहून परतल्यानंतर तेथील मँचेस्टर कॉलेजच्या धर्तीवर विशिष्ट महाविद्यालयाची स्थापना शिंदेंनी करावी अशी महाराजांची इच्छा होती. त्यानुसार शिंदेंनी तसा आराखडादेखील केला होता. यासंदर्भात शिंदेंनी नोंदविलेला अनुभव महत्त्वाचा आहे. शिंदे लिहितात, 'ऑक्सफर्डच्या मँचेस्टर कॉलेजच्या ह्या विश्वधर्माच्या अध्ययनाप्रीत्यर्थ बडोदा संस्थानात एक विद्यालय असावे असा महाराजांचा फार दिवसांचा मनोदय होतो. मागे जेव्हा जेव्हा ते मुंबई - पुण्यास येऊन मला भेटण्यास बोलवित तेव्हा तेव्हा हा विषय काढून महाराज माझ्याशी विचारविनिमय करीत आणि ह्या कामासाठी मी बडोद्याला येऊन राहावे अशी इच्छा प्रदर्शित करत. पण माझ्या इतर कार्यबाहुल्यामुळे आजवर ते शक्य झाले नव्हते. आता पुन्हा तोच विषय काढून, ह्याविषयी एखादी निश्चित योजना तयार करून देण्याचे महाराजांनी मला सांगितले. मी त्यांना काही टिपणे लिहून दिली. तेवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी तीन व्यवस्थित योजना मागितल्या एक साधी आणि कमी खर्चाची, दुसरी त्याहून अधिक खर्चाची, पण अधिक तपशिलाची तिसरी पद्धतशीर मँचेस्टर कॉलेजसारख्या एखाद्याच कॉलेजची. '

महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे / १०