Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लक्ष्मीविलास दरबार हॉलच्या चित्रांसाठी रवी वर्मांची निवड
 १८८८ ला एकदा महाराजा सयाजीराव उटकमंडला (आताचे उटी) टी. माधवरावांबरोबर फिरायला बाहेर पडले होते. ते दोघे एकटेच होते. सोबत कुणीही सेवक नव्हते. त्यावेळेस टी. माधवराव बडोद्याच्या दिवाणगिरीतून सेवानिवृत्त झालेले होते. पण महाराजांचे हे वैशिष्ट्य होते की, ते व्यवहार आणि मैत्री या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या जागी ठेवत असत. टी. माधवरावंबरोबरची त्यांची मैत्री पहिल्यासारखीच टिकून होती. महाराज बडोद्याच्या एकूण सर्व राज्यकारभाराविषयी त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारत असत. बडोद्यात काय काय सुधारणा होत आहेत त्याविषयी टी. माधवरावांना सांगत असत. त्यावेळी लक्ष्मीविलास पॅलेसचे बांधकाम पूर्ण होत आले होते. पॅलेसच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी त्यांनी पाश्चात्त्य देशांतून पुष्कळ ब्राँझचे पुतळे आणले होते. काही तैलचित्रही आणले होते; पण महाराजांना दरबार हॉलमध्ये भारतीय संस्कृती अधोरेखित करणारी चित्रकला अपेक्षित होती. रामायण-महाभारत हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहेत. त्यामुळे ही संस्कृती जाणणाऱ्या कलाकाराचा शोध ते घेत होते. युरोपात त्यांनी अशी मोठमोठाली भित्तिचित्रे आणि छतं चित्तारलेली पाहिली होती. दरबार हॉलसाठी पाश्चात्य चित्रकाराला ते सहज नेमू शकत होते. परंतु भारतीय संस्कृतीचा जाण असलेला कलाकार हे काम अधिक

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / २२