Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आत्मीयतेने करू शकेल असा त्यांचा विश्वास होता. त्यांनी टी. माधवरावांकडे असा कोणी कलाकार आहे का? म्हणून चौकशी केली आणि काहीही वेळ न घालवता त्यांनी सुचविले. असा एकच योग्य चित्रकार आहे आणि तो म्हणजे “ राजा रवी वर्मा". टी. माधवरावांच्या वाक्यावर शिक्कामोर्तब करत सयाजीरावांनी राजा रवी वर्माकडून हे काम करून घ्यायचे ठरविले. टी. माधवरावांनी याआधी राजा रवी वर्माकडून राजघराण्यातले चार तैलचित्रे काढून घेतली होती. तसेच मोतीबागेतल्या दरबारासाठी पौराणिक चार चित्रे काढून घेतली होती.
 राजा रवी वर्मांना बडोद्यात बोलावण्यासाठी महाराजांनी स्वतः त्याच्याकडे जायचे ठरविले; परंतु बडोद्याचे महाराज या नात्यानं त्यांना राजा रवी वर्माच्या राज्यात म्हणजे त्रिवेंद्रमला जाणे म्हणजे इंग्रज राजसत्तेची परवानगी घ्यावी लागणार होती. शिवाय सर्व गोष्टी करण्यासाठी बराच वेळ लागू शकणार होता. म्हणून टी. माधवरावांनी राजा रवी वर्मालाच उटकमंडला महाराजांच्या भेटीस बोलावण्याची व्यवस्था केली. टी. माधवरावांनी राजा रवी वर्माला स्वतः पत्र लिहून महाराजांना भेटण्यासाठी उटकमंडला येण्याची विनंती केली.

 राजा रवी वर्मा टी. माधवरावाच्या विनंतीस मान देऊन लगेच उटकमंडला आले. टी. माधवरांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या निवासाची व्यवस्था आपल्याच निवासस्थानी केली. तातडीनं बोलावण्याचे कारण जाणून घेण्यास राजा रवी वर्मा

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / २३