Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

की त्याच वेळी राजा रवी वर्मांनी टी. माधवरावांना ते चित्र भेट म्हणून देऊन टाकले आणि हेच चित्र टी. माधवरावांनी पुण्याच्या प्रदर्शनात पाठवले होते. या चित्राने त्यांना खूप प्रसिध्दी मिळवून दिली होती. राजा रवी वर्माने त्या चित्राच्या दोन प्रतिकृती करून ठेवल्या होत्या. ते चित्र एका 'कामिनी' नावाच्या सुंदर नाजूक मुलीचे तैलचित्र होते.
राजा रवी वर्मास १८८१ ला महाराजांच्या राज्याभिषेकाचे आमंत्रण

 १८८१ ला टी. माधवराव राजा रवी वर्मा आणि राज वर्मा या दोघा भावांना बडोद्याच्या राज्याभिषेकाचे अगत्याचे आमंत्रण देण्यासाठी जातीने त्यांच्याकडे गेले. जाताना ते राजा रवी वर्मांनी प्रदर्शनात प्रथम पारितोषिक मिळालेले सुवर्णपदक घेऊन गेले. यापूर्वी राजा रवी वर्माला बरीच पारितोषिक मिळाली होती. परंतु बडोद्याचे दिवाण या नात्याने त्यांनी ते सुवर्णपदक स्वःतः राजा रवी वर्मास प्रदान करणे उचित समजले. राजा रवी वर्मानेही ते पदक आदराने मस्तकी लावून स्वीकारले. प्रदर्शनात हे चित्र मुंबईचे त्या वेळेचे गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन यांना खूप आवडले आणि त्यांनी त्याची मागणी केली. ही गोष्ट टी. माधवरावांनी जेव्हा राजा रवी वर्माला सांगितली त्यावेळी दुसरी प्रतिकृती असलेले चित्र त्यांनी टी. माधवरावांना देऊन टाकले. त्याची किंमत म्हणून बदल्यात “माझ्यावर असेच अखंड प्रेम करत राहा” हे मागितले.

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / २०