Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'राजा रवी वर्मा' असे नोंदविले गेले. राजे आईल्यम तिरुनाल निवर्तल्यावर दिवाण टी. माधवरावांनी त्रावणकोर राज्यघराणे सोडले. ते नंतर बडोद्याचे दिवाण झाले. त्यावेळेस महाराज सयाजीराव गायकवाड खूप लहान होते आणि टी. माधवरावांच्या नेतृत्वाखाली राज्यकारभाराचे धडे शिकत होते.
 टी. माधवरावांनी बडोद्याच्या दरबारासाठी राजा रवी वर्मा यांचे 'सीताभूमिप्रवेश' हे चित्र खरेदी केले होते.
 ते चित्र घ्यायला आले तेव्हा त्यांना राजा रवी वर्मांनी बनविलेल्या नायर स्त्रीचे चित्र खूप आवडले होते. योगायोग असा

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / १९