पान:महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कर्तव्यनिष्ठा यांचे संस्कार होते, त्यामुळे त्यांनी ज्या विभागात आपली नेमणूक होईल तेथील कामे अत्यंत चोखपणे पार पाडली.
बडोदा कॉलेजमधील अध्यापनाचे काम
 अरविंद घोष यांची अनेक मानाच्या पदावर नेमणूक केली तरी त्यांचा ओढा हा शिक्षण क्षेत्राकडे अधिक होता. म्हणून बडोदा कॉलेजमध्ये फ्रेंच भाषेच्या अर्धवेळ प्राध्यापकाची जागा रिक्त झाल्याबरोबर त्याठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली. फ्रेंच भाषेत इंग्लंडमधील अध्ययन काळातच ते पारंगत असल्याने त्यांना ही जागा सन्मानपूर्वक देण्यात आली. जरी ही जागा अर्धवेळ प्राध्यापकाची असली तरी त्यांना इतरही कामे पूर्वीप्रमाणेच करावी लागत होती. त्यामध्ये अनेक वेळा महाराजांबरोबर नानाविध गंभीर आणि इतर विषयांवर चर्चा करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सल्ला देणे, अशा गोपनीय कामांचा समावेश होता.
 पुढे बडोदा कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाची जागा इ.स. १९०० मध्ये रिक्त झाली. महाराजांनी तत्काळ त्या जागेवर त्यांची नियुक्ती केली. अध्यापन हा आवडीचा विषय असल्याने अरविंद घोष आपल्या ज्ञान आणि प्रतिभेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाले. अरविंद घोष आपल्याला शिकवायला द्यावेत म्हणून अनेकदा विद्यार्थ्यांनी शिफारसपत्रे प्राचार्यांकडे दिली. याबाबतची एक आठवण बडोद्यात ३८
महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष / ९