पान:महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नोकरी त्यांनी स्वीकारली. त्यांना सयाजीराव महाराजांसारख्या देशप्रेमी, सुधारक आणि पुरोगामी राजाच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आकर्षण वाटत होते. ज्या दिवशी अरविंद घोष यांची मुलखात झाली त्यादिवसापासून सयाजीराव महाराजांनी त्यांना पगार केला. कदाचित हा अनमोल हिरा आपल्याकडून दुसरीकडे सुरू जाऊ नये हेही धोरण महाराजांचे असू शकते.
अरविंद घोष यांची बडोद्यातील नोकरी
 अरविंद परदेशातून ८ फेब्रुवारी १८९३ रोजी बडोद्यात आले. पण त्याकाळात त्यांच्या योग्यतेचे एकही पद रिक्त नव्हते. म्हणून महाराजांनी त्यांना नेहमीच वरिष्ठ दर्जाच्या कामात व्यस्त ठेवले. काही काळ स्वीय सल्लागार म्हणून काम दिले तर काही काळ इतर महत्त्वाच्या कामात त्यांना गुंतवून ठेवले. बडोदा राज्यात अरविंद घोष काय काम करतात याला अजिबात महत्त्व नव्हते; तर ते फक्त बडोद्यात असण्याला खूप महत्त्व होते. म्हणून महाराजांनी त्यांना सुरुवातीच्या काळात इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांबरोबर दोनशे रुपये वेतन ठेवले. बडोद्यात रुजू झाल्यावर सर्वप्रथम त्यांना कचेरीत सेटलमेंट डिपार्टमेंटमध्ये काम देण्यात आले. पुढे काही काळानंतर स्टँप आणि रिव्हेन्यू विभागात बदली करण्यात आली. सुरुवातीच्या काळात त्यांनी ठराविक अशा एका विभागात दिवस काम केले नाही. कारण त्यांना शिक्षण क्षेत्राबद्दल जसे आकर्षण होते तसे सरकारी, कचेरी कामाची अजिबात आवड नव्हती. बालपणापासून त्यांच्या मनावर प्रामाणिकपणा आणि

महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष / ८