पान:महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्षे नोकरी केलेल्या रियासतकार गो. स. सरदेसाई यांच्या 'सयाजीराव गायकवाड यांच्या सहवासात' या पुस्तकात दिली आहे. 'अरविंदबाबू बडोदा कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. ते इंग्रजी कविता शिकवू लागले की सर्व विद्यार्थी त्यांचा प्रशांत भाषण औघ ऐकून सर्वथा गुंग बनत.' इ.स. १९०४ मध्ये बडोदा कॉलेजमध्ये उपप्राचार्यपद रिक्त झाल्याने त्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली. तर पुढे काही वर्षांनी प्राचार्य म्हणू त्यांनी पदभार सांभाळला.
सयाजीराव महाराजांना भाषणात मदत
 अरविंद घोष हे तीक्ष्ण बुद्धीचे, इंग्रजी विषयात पारंगत असणारे प्राध्यापक होते. इंग्रजांच्या कुटिल नीतीचा त्यांना अभ्यास होता. त्यामुळे सयाजीराव महाराजांना महत्त्वाच्या ठिकाणी ज्यावेळी भाषण करण्याचा प्रसंग येई त्यावेळी महाराजांनी तयार केलेली भाषणाची स्क्रिप्ट वाचून पाहणे, त्यात बदल सुचवणे, इंग्रजांचा रोष महाराजांवर येऊ नये म्हणून वाक्यात बदल करणे किंवा तोच मुद्दा सौम्य भाषेत सांगण्यासाठी वाक्यरचना बदलणे अशा प्रकारचे अनेक बदल, दुरुस्ती किंवा इतर महत्त्वपूर्ण माहिती समाविष्ट करणे अशी कामे महाराज अरविंद घोष यांच्याकडे सोपवत असत. सरदेसाई याबद्दलची एक आठवण सांगतात, 'एकदा सामाजिक परिषदेपुढे महाराजांस भाषण करावयाचे होते. ते अरविंद घोषांनी तयार करून आणले. आम्ही तिघांनी बसून ते वाचले. त्यावर महाराज बोलले, हे भाषण इतके उच्च

महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष / १०