पान:महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आले. हे सर्व आरोप महाराजांना बदनाम करण्यासाठीच होते. या बापटांना त्यांची बाजू मांडू न देता पदावरून कमी करण्यात आले. यामध्ये बडोद्याचे तत्कालीन दिवाणांचाही हात होता. महाराजांना त्यांचे मित्र खासेराव जाधव यांनी पत्राद्वारे या सर्व बाबी अवगत केल्या होत्या. महाराज मायदेशी परत येताच त्यांनी इ.स. १८९५ मध्ये पुन्हा ही केस अभ्यासासाठी हाती घेतली. याविषयावर महाराजांनी अरविंद घोष यांची मदत घेतली. त्यावर पुन्हा अभ्यास केला आणि बापटांना निर्दोष ठरवत इंग्रज अधिकाऱ्यांनी रचलेले कुभांड नामेनिराळे करून टाकले. यामधील सर्व बाबी महाराजांनी इतक्या शांतपणे हाताळल्या की, कोणत्याही इंग्रज अधिकाऱ्यांची पुन्हा या विषयावर बोलण्याची हिंमत झाली नाही.
 फक्त प्राध्यापक म्हणून अरविंद घोष बडोद्यात आले नव्हते; तर सयाजीराव महाराजांच्या आश्रयाखाली स्वातंत्र्यचळवळीतील एक मोठा गट कार्यरत होता, यामध्ये सहभाग घेऊन इंग्रजांना शह देणे हे महत्त्वाचे कार्य त्यांना पार पाडायचे होते. त्यांनी इंदुप्रकाश वृत्तपत्रातून ‘जुन्या ऐवजी नवे दीप' (न्यू लॅप्स फॉर ओल्ड) या लेखमालेतून इंग्रजांच्या दडपशाहीचे वाभाडे काढण्यास सुरुवात केली. त्यांच्या तेजस्वी वाणीने आणि धारधार लेखणीने बडोद्यातील अनेक तरुण स्वातंत्र्यलढ्याकडे आकर्षिले गेले. ही लेखमाला जवळजवळ सहा महिने सुरू होती. अरविंद घोष अनेकदा बडोद्याहून सुटी घेऊन कलकत्ता येथे जात. त्या ठिकाणी

महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष / १२