पान:महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकारचे उतरले आहे की, लोकांना ते माझे असे वाटणार नाही. म्हणून ते जरा कमी दर्जावर आणले पाहिजे. “Can you not, Aravindbabu tone it down? It is too fine to appear to be mine” त्यावर किंचित हसून अरविंद म्हणाले, मुद्दाम कशाला ती फिरवाफिरव करा: महाराज तुम्हाला असे वाटते की, थोडे गचाळ केले म्हणजे ते तुमचेच आहे असे लोक मानतील? चांगले असो, वाईट असो, लोक नेहमीच म्हणणार की महाराज आपली भाषणे दुसऱ्यांकडून लिहवून वाचतात. विचार तुमचेच आहेत ना ! तोच तुमचा मुख्य अंश.” महाराजांनी सभेत ते भाषण पुढे वाचले. तेव्हा त्यांची फार वाहवा झाली. ' अरविंद घोष महाराजांच्या अगदी अंतर्गत वर्तुळात वावरत होते; परंतु महाराजांपुढे त्यांनी कधी हार मानली नाही. जे योग्य आहे त्याला योग्य म्हणण्याची ताकद आणि परिपक्वता त्यांनी कमावली होती. म्हणूनच महाराज त्यांचा सल्ला मानत असत.
बडोद्यातील वास्तव्यात स्वातंत्र्यलढ्यात सहभाग
 महाराज परदेशात गेले, की त्यांच्या पश्चात बडोद्यातील रेसिडेंट काहीतरी प्रकरण उकरून काढून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असत. असेच एकदा महाराज परदेशात असताना त्यांचे गुरू एफ.ए.एच. इलियट प्रमुख असलेल्या बारखळी खात्याचे एक प्रकरण बाहेर काढण्यात आले. यामधील इलियट यांच्या हाताखालील अधिकारी वासुदेव सदाशिव बापट लोकांकडून लाच घेतात आणि इतरही काही आरोप त्यांच्यावर करण्यात

महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष / ११