पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फुल्यांनी लिहिलेल्या, "विद्येविना मति गेली, मतीविना नीति गेली, नीतिविना गती गेली! गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.” या ओळींची पारायणे महाराष्ट्रात गेली १०० वर्षे सुरू आहेत, परंतु या ओळीतील विचार सत्यात उतरण्याचा यशस्वी प्रयत्न सयाजीरावांनीच केला.
 महात्मा फुले यांनी बडोद्यामध्ये महाराजांसमोर आपल्या ‘शेतकऱ्यांचा असूड' ग्रंथाचे जाहीर वाचन केले. महाराजांनी या पुस्तकाच्या छपाईसाठी केलेल्या आर्थिक मदतीचा उल्लेख या ग्रंथाच्या शेवटच्या पानावर येतो. १८९० मध्ये फुलेंचा मृत्यू झाला. मामा परमानंदांच्या शिफारशीवरून सावित्रीबाई आणि मुलगा यशवंत यांना १००० रु. चा चेक देताना महाराज धामणस्कर यांना म्हणाले, “जोतीबांचे स्मारक होणे जरूर आहे आणि ते करण्याचे कोणी मनावर घेत असल्यास स्मारक फंडासाठी मदत करण्याची माझी तयारी आहे.” यावरून महाराजांची फुलेंविषयी कृतज्ञता व्यक्त होते. तर महात्मा फुले जेव्हा महाराजांवर एक पत्ररूपात कविता आणि अखंड ही लिहितात आणि महाराजांचा फोटो मागवून आपल्या बैठकीच्या खोलीत लावतात तेव्हा महात्मा फुले महाराजा सयाजीराव गायकवाड यांना आपला आदर्श मानत असल्याचे पुरावे त्याचबरोबर मिळतात.
मराठा जातीचे उद्धारक

 आधुनिक महाराष्ट्रात मराठा जातीच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सर्वप्रथम आणि सर्वाधिक योगदान देणारया

महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती / १९