पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 साहित्यमय झालेल्या बडोदा नगरीत ज्या अनेक साहित्यविषयक संस्था उदयास येत होत्या त्यापैकी एक मंडळ म्हणजे ‘महाराष्ट्र वाङ्मयमंडळ' होय. पदार्थशास्त्रातील विद्युत या विषयावरील शब्दकोश या मंडळातर्फे तयार करण्यात आला. श्रीधर व्यंकटेश केतकर निर्मित महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या २,००० रु. किमतीच्या प्रती सयाजीरावांनी विकत घेतल्या. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम ५६ लाख ३४ हजार रु. हून अधिक भरते. याच केतकरांना महाराजा सयाजीरावांनी अमेरिकेतील जातीवरील समाजशास्त्रीय संशोधनासाठी १९०६ ते १९१० अशी चार वर्षे शिष्यवृत्ती दिली होती.
बडोद्यातील मराठी वृत्तपत्रे
 बडोद्यात १८८५ मध्ये रामजी संतूजी आवटे आणि यंदे यांनी 'बडोदा वत्सल' हे साप्ताहिक तर १८९३ मध्ये दामोदर सावळाराम यंदे यांनी स्वतंत्रपणे 'सयाजीविजय' नावाचे मराठी साप्ताहिक सुरू केले. याबरोबरच बडोदा संस्थानात बडोदा गॅझेट, हिंद विजय, नवसारी प्रकाश, भारत मित्र इ. दैनिके व मासिकांचा उदयास्त होत राहिला. १२० वर्षापूर्वी महाराजांनी गुजराती प्रांतात मराठी भाषेची विविधांगी सेवा अखंडपणे केली जी सेवा करणे महाराष्ट्राला आजही शक्य झाले नाही.

 मराठी रंगभूमीवरील बालगंधर्व आणि दादासाहेब फाळके या दोन अनमोल हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम महाराजांनी केले. १९९३ मध्ये बालगंधर्वांनी 'गंधर्व नाटक मंडळी'ची

महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती / १४