पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

of Oriental Institute' हे इंग्रजी नियतकालिक १९५१ मध्ये सुरू करण्यात आले. तर १९६२ मध्ये सुरू करण्यात आलेले 'स्वाध्याय' हे गुजराथी नियतकालिक बडोद्याच्या बौद्धिक श्रीमंतीचा पुरावा देते.
व्यायाम मासिक

 व्यायाम या विषयाला वाहिलेले मराठीतील पहिले मासिक १९१५ मध्ये ‘व्यायाम’ या नावाने आबासाहेब मुजुमदार यांच्या संपादनाखाली सुरू केले. हे मासिक ४३ वर्षे बडोद्यात सुरू होते. ते मराठी बरोबरच गुजराथी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेत निघत होते. विद्यार्थ्यांसाठी 'व्यायाम' मासिक फारच उपयुक्त असल्याने याच्या ५०० प्रती बडोदा संस्थानातील शाळांना घेण्याचा हुकूम सयाजीरावांनी काढला होता. महाराजांकडून मिळालेला हा पाठिंबा या मासिकासाठी उपकारक ठरला. याच आबासाहेब मुजुमदारांनी १० खंडात प्रकाशित केलेला ‘व्यायामकोश' हा आजही मराठीतील व्यायामासंदर्भातला एकमेव कोश आहे. या कामाला सयाजीरावांनी भक्कम आर्थिक पाठबळ दिले नसते तर मुजुमदारांना हे काम शक्य झाले असे स्वतः मुजुमदारांनी नोंदविले आहे.

महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता / २०