पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्त्रीसहभाग अधिकच नजरेत भरतो. आजही एखाद्या महाविद्यालयाने नियमितपणे असे व्यावसायिक नियतकालिक चालविण्याचे उदाहरण भारतात आढळत नाही. यावरून बडोदा उर्वरित भारताच्या १२० वर्षे पुढे होता हे लक्षात येईल. १८९५ ला या मासिकाची पृष्ठसंख्या ४४ होती व ते इंग्रजीतून निघत होते. तर १९३२ मध्ये या नियतकालिकाची पृष्ठसंख्या १२० वर गेली. या नियतकालिकात १९३२ मध्ये इंग्रजीबरोबर संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराथी, उर्दू या पाच भाषेतील मजकूर छापला जात होता. एकूण सहा भाषेतील मजकूराचा समावेश असणारे हे आजअखेर भारतातील एकमेव नियतकालिक असावे.

 बडोदा कॉलेजमधील तुलनात्मक धर्म अभ्यास अध्यासनातर्फे 'इंडियन फिलॉसॉफीकल रिव्ह्यू' आणि 'इंडियन जर्नल ऑफ सोशिओलॉजी' ही दोन त्रैमासिके प्रकाशित होत होती. 'इंडियन फिलॉसॉफीकल रिव्ह्यू' चे संपादन विजेरी करत होते. जुलै १९१७ मध्ये 'इंडियन फिलॉसॉफीकल रिव्ह्यू' चा पहिला अंक प्रकाशित झाला. ते चार वर्षे चालले. या अध्यासनाबरोबरच बडोदा सेंट्रल लायब्ररीचा संस्कृत विभाग गायकवाड ओरिएंटल सिरिजच्या माध्यमातून या कामाला पूरक काम करत होता. या मालेचे पहिले संपादक पंडित चिमनलाल हे होते. बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेचे मुखपृष्ठ असणारे 'Journal

महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता / १९