पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होते त्याला बडोदा संस्थान अपवाद होते. कारण बडोदा संस्थानातील स्वतंत्र वृत्तपत्र धोरणामुळे बडोद्यातील वृत्तपत्रे ब्रिटिश सरकारच्या कोणत्याही बंधनात न राहता स्वतंत्रपणे आपली पत्रकारिता करत होती.
बडोदा कॉलेजचे नियतकालिक : एक अभिनव उपक्रम

 येथे विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे तत्कालीन ५६५ देशी संस्थानिकांमध्ये संस्थानतर्फे कॉलेज सुरू करणारे बडोदा हे भारतातील पहिले संस्थान होते. १८७९ मध्ये बडोदा कॉलेजची पायाभरणी झाली. या महाविद्यालयातील विद्यार्थांकडून कॉलेज नियतकालिक दरमहा प्रकाशित करण्याचा उपक्रम १८९५ मध्ये सुरू झाला. या नियतकालिकाचे संपूर्ण काम विद्यार्थी करत असत. संपादक म्हणून विद्यार्थ्यांची नावे मुखपृष्ठावर छापली जात. या नियतकालिकाला वार्षिक वर्गणीदार होते. व्यावसायिक नियतकालिकाच्या धर्तीवर याचे काम चालत असे. १९१७ मध्ये या नियतकालिकाच्या संपादक मंडळात एक मुलगीही होती. ही बाब तर त्याहूनही क्रांतिकारक मानवी लागेल कारण याच वर्षी शाहू महाराजांच्या सुनबाई इंदुमतीदेवी यांना लग्नांनंतर लगेचच वैधव्य आले. त्यावेळी त्यांना शिकवण्यासाठी शाहू महाराजांसारख्या क्रांतिकारक सुधारकाला संघर्ष करावा लागला. त्यामुळे बडोदा कॉलेजमधील

महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता / १८