पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणजे सवडीप्रमाणे महाराज त्या पाहुण्यांची भेट घेतील. तसेच कोणत्याही वर्तमानपत्राबाबत येथे केव्हाही बंदी घालण्यात आलेली नव्हती. बडोद्याबाहेरील ब्रिटिश हद्दीतील सरकारला अप्रिय असलेले लोक तर बडोद्यास येऊन स्वस्थतेने राहत." असे स्वातंत्र्य आजही मिळणे दुरापास्त झाले आहे.
बडोद्याचे वृत्तपत्र स्वातंत्र्य

 बडोदा संस्थानाने १९०९ मध्ये 'पुढारी' वर्तमानपत्र सुरू करण्यास परवानगी दिली. व्ही. पी. साठे याचे संपादक म्हणून कार्यरत होते. पुढरीमध्ये वारंवार ब्रिटिश सरकारच्या विरोधातील मजकूर प्रकाशित होत असून देखील सयाजीराव महाराज पुढारीच्या संपादकांवर कारवाई न करता केवळ नामधारी समज देत. १९१० मध्ये 'चाबूक' या वृत्तपत्रातसुद्धा आक्षेपार्ह लेख छापल्याबद्दल ब्रिटिश सरकारकडून आक्षेप घेण्यात आला होता. यानंतरही 'चाबूक'मध्ये ब्रिटिश विरोधी लेख प्रकाशित होत राहिले. त्यामुळे अखेरीस हिंदुस्तान सरकारच्या हस्तक्षेपाने ही दोन्ही वृत्तपत्रे बंद करण्यात आली. तसेच 'बडोदा गॅझेट'मध्ये बादशहाच्या हिंदुस्थान भेटीच्या संदर्भात टीका करणारा आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित केला होता. तरीदेखील बडोदा सरकारने 'बडोदा गॅझेट' वर कोणतीही कारवाई केली नाही. वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याबाबत ब्रिटीश भारतात जे ब्रिटिश सरकारचे कायदे

महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता / १७