पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

क्रांतिकारकांच्या शोधात : सयाजीराव

 स्वातंत्र्याच्या ध्यासाने प्रेरित झालेले सयाजीराव नेहमी क्रांतिकारक राष्ट्रप्रेमी अधिकाऱ्यांच्या शोधात असत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे प्रसिद्ध बंगाली आय. सी. एस. अधिकारी रमेशचंद्र दत्त यांची बडोद्यात केलेली नेमणूक होय. बंगालमध्ये डिव्हिजनल कमिशनर असणारे श्री. दत्त ब्रिटिश शासनाच्या आर्थिक नीतीचे टीकाकार होते. विनायक दामोदर सावरकरांचे धाकटे बंधू नारायण सावरकर नुकतेच डॉक्टर झाले होते. त्यांची मुंबईत दवाखाना सुरू करण्याची इच्छा होती. या काळात सावरकर अंदमान येथे कैदेत होते. सावरकरांनी अंदमानहून आपल्या भावाला पत्र लिहून कळविले की, "तू asोद्यास जा. तेथे प्रज्ञावान आणि देशप्रेमी राजा राज्य करत आहे.”

 सयाजीराव लंडनमध्ये असताना हाइड पार्कमध्ये श्यामजी कृष्ण वर्मांसोबत फिरायला जात. श्यामजींच्या मनात असणारे राष्ट्रप्रेम आणि स्वातंत्र्यप्राप्तीचा ध्यास यामुळे सयाजीराव त्यांना मदत करू लागले. लंडनमध्येच सयाजीरावांच्या मादाम कामा, तारकनाथ दास, बिपीनचंद्र पाल या क्रांतिकारकांशी भेटी होत गेल्या. अरविंद घोष तर महाराजांचे प्रायव्हेट सेक्रेटरी होते. महाराजांचा या क्रांतिकारकांशी असणारा संपर्क आणि त्यांना केली जाणारी मदत ब्रिटिश सरकारपासून लपून राहिली नाही. यासंदर्भातील महाराजांविरुद्धचे अहवाल वरिष्ठांकडे जाऊ

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / २२