पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भेटीगाठीतून राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या संकल्पनेचा आराखडा तयार होत गेला. खासेरावांवर टिळकांच्या विचारांचाही प्रभाव होता. खासेरावांच्या पुढाकाराने बडोद्यात गणेशोत्सव, शिवजयंती हे राष्ट्रप्रेमाच्या निमित्त होणारे कार्यक्रम सुरू झाले.

अरविंद घोष

 १८९२ ला अरविंद घोष या तरुण क्रांतिकारकांची लंडन येथे महाराजांशी भेट झाली. अरविंद घोष आय. सी. एस. ची लेखी परीक्षा पास झाले होते. परंतु घोडेस्वारीची चाचणी न देता त्यांनी ब्रिटिश प्रशासनात नोकरी नाकारली. सयाजीरावांनी अरविंद घोषांना बडोद्यास येण्याचे निमंत्रण दिले. महाराजांच्या या निमंत्रणावरून अरविंद घोष १८९३ ला बडोद्यास आले. बडोद्यात त्यांच्या राहण्याची व्यवस्था खासेरावांच्या बंगल्यात करण्यात आली. पुढे बडोदा सोडेपर्यंत दहा-बारा वर्षे ते तेथेच राहिले.

 इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेत असणारे 'इंदुप्रकाश' हे साप्ताहिक मुंबईहून प्रकाशित होत असे. या साप्ताहिकाचे मालक सावळाराम यंदे यांना अगदी सुरुवातीपासूनच सयाजीरावांचे भक्कम पाठबळ होते. इंदुप्रकाशच्या इंग्रजी आवृत्तीचे संपादक बॅ. केशवराव देशपांडे आणि अरविंद घोष लंडनला असल्यापासून मित्र होते. केशवरावांनी अरविंदांना राजकारण आणि संस्कृतीवर इंदुप्रकाशमध्ये लेखमाला लिहायला सांगितली. 'न्यू लॅम्प फॉर ओल्ड' असे लेखमालेचे तर 'झिरो' असे लेखकाचे नाव ठरविण्यात आले. या लेखांमधून अरविंद घोष पारतंत्र्यात

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / १७