पान:महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बडोद्याची 'द गायकवाड स्टडीज इन रिलीजन अँड
फिलॉसॉफी' ग्रंथमाला

 १९१८ मध्ये सुरू केलेली 'द गायकवाड स्टडीज इन रिलीजन अँड फिलॉसॉफी' ही ग्रंथमाला सुरू केली. तुलनात्मक धर्म अभ्यासावरील ही जगातील पहिली आणि आजअखेरची एकमेव ग्रंथमाला आहे. सयाजीरावांनी मराठी, गुजराथी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत ८-१० ग्रंथमाला प्रकाशित केल्या, त्यापैकी 'द गायकवाड स्टडीज इन रिलिजीन अँड फिलॉसॉफी' ही ग्रंथमाला सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण होती. एका अर्थाने सयाजीरावांच्या विश्वबंधुत्ववादी दृष्टीची जगाला लाभलेली ही 'बौद्धिक भेट' होती. कारण या मालेच्या घोषणेतच 'सहिष्णू भूमिकेतून आणि अलौकिक बुद्धिमत्तेच्या व्यासंगातून लिहिलेले ग्रंथच या मालेसाठी स्वीकारले जातील' अशी स्पष्ट भूमिका आढळते.

 या मालेतील सर्व ग्रंथ इंग्रजीत प्रकाशित झाले होते याची दोन कारणे असावीत. पहिले कारण हे असावे की यासाठीचे संशोधक आणि लेखक एक तर परदेशी होते किंवा इंग्रजीत लिहिणारे होते. दुसरे कारण म्हणजे हे ग्रंथ प्रकाशित करत असताना जगभरातील अभ्यासकांना डोळ्यासमोर ठेवून व्यापक भूमिकेतून ती तयार केली होती. तुलनात्मक धर्म अभ्यासाचे हे

महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म / १७