पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/२८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यांनी लिहिलेल्या 'एकच प्याला' या मद्यपानाशी संबंधित मराठी नाटकाचा पहिला प्रयोग २० फेब्रुवारी १९१९ ला गंधर्व नाटक मंडळीने बडोद्यात केला. महाराज नाट्यसंगीत ऐकण्यास बसतपरंतु महाराणी चिमणाबाईंना मात्र संगीताचा खरा शौक होता. त्या स्वतः सतार वाद्य वाजवित असत. बालगंधर्वांच्या चोळ्या महाराणी चिमणाबाईंना फार आवडत असत. त्या बालगंधर्वांचे

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / २८