Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ब्लाऊज गुपचूप राजमहालात मागवून घेत. चोळ्यांची शिलाई कशी आहे हे चिमणाबाई स्वत: बघत आणि तसेच ब्लाऊज बनवून घेत असत.
 बालगंधर्वांनी साकारलेली महाराष्ट्रीयन स्त्री आणि तिची वेषभूषा ही राजा रवी वर्मांच्या सुरुवातीच्या लोकप्रिय चित्रांवरून आणि बडोद्यातील वास्तव्यात प्रत्यक्ष निरीक्षणातून घेतली असल्याचे नाकारता येत नाही. या फॅशन त्यावेळेस महाराष्ट्रात प्रचलित नव्हत्या त्या बालगंधर्व बडोद्यात राहून आल्यानंतर लोकप्रिय झाल्या अश्या नोंदी सापडतात. त्यामुळे बालगंधर्वांच्या वाढत्या लोकप्रियतेमध्ये बडोदा वास्तव्याचा मोठा वाटा मानला जातो. खुद्द बालगंधर्व सयाजीरावांना आपले दैवत मानत असत.
गायिका लक्ष्मीबाई जाधव बडोद्यात, १९२४
 कोल्हापूरच्या लक्ष्मीबाई जाधव या प्रसिध्द गायिका बडोदा दरबारात १९२४ ते १९४४ पर्यंत होत्या. लहानपणीच आई- वडीलांचे छत्र हरपलेल्या लक्ष्मीबाईंना मावशीकडे रहावे लागले. मावशींच्या यजमानांना गाण्याची आवड होती. त्यामुळे लक्ष्मीबाईंना त्यांनी चांगला गुरू शोधून दिला. लक्ष्मीबाईंनी १९१७ साली अल्लादिया खाँसाहेबांचे बंधू हैदर खाँ यांच्याकडे गायनाचे धडे शिकायला सुरुवात केली. लक्ष्मीबाईंचा आवाज खूप मधूर आणि 'नाजूक होता. लक्ष्मीबाईंनी शास्त्रीय संगीताचा खूप अभ्यास करून आपली दृष्टी व्यापक केली होती.

 सयाजीराव महाराजांना पहिल्या महाराणी चिमणाबाईंच्या अचानक जाण्याचे प्रचंड दु:ख होऊन निद्रानाशाचा आजार

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / २९