पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/२४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्व प्रांतात फिरून गायनशास्त्रातील प्राचीन ग्रंथ मिळविले. त्याचा गाढा अभ्यास करून त्यावर नवीन ग्रंथ लिहिले. काही महत्त्वाच्या ग्रंथांची यादी खाली दिली आहे.
 १. ‘संस्कृत लक्षसंगीत' या ग्रंथात प्रचलित हिंदुस्थानी संगीतातील रागांची संपूर्ण माहिती देऊन त्याबद्दल चर्चा केली आहे.
 २. संस्कृत अभिनवरागमंजिरी
 ३. ‘हिंदुस्थानी संगीत पद्धती' भाग १ -४ ही पुस्तके मराठीत असून, यात विद्यार्थ्यांसाठी रागांचे उत्तम विवरण केले आहे.
 ४. हिंदुस्थानी संगीत क्रमिक पुस्तकमाला भाग १-४ या पुस्तकात हिंदुस्थानातील प्रसिद्ध गायकांच्या उत्कृष्ट चिजा नोटेशनसह निरनिराळ्या रागात आणि तालात दिलेल्या आहेत. ही पुस्तके हिंदुस्थानातील सर्व भागातल्या संगीत पाठशाळेतून क्रमिक पुस्तके म्हणून प्रचलित आहेत.
पहिली अखिल भारतीय संगीत परिषद बडोदे, १९१६

 गायनकलेला महाराजांनी आपल्या कारकीर्दीच्या आरंभापासून उत्तेजन दिले होते. तिचा प्रसार अधिक विस्तृत प्रमाणावर होण्यासाठी व भिन्न भिन्न संगीत संप्रदायांच्या तज्ज्ञांना एकत्र आणून त्यांना परस्परांशी विचारविनिमय करण्याची संधी देण्यासाठी महाराजांनी २० फेब्रुवारी १९९६ ला पहिली अखिल भारतीय संगीत परिषदेची बैठक बडोद्यास भरविली.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / २४