बडोद्यात या संगीत परिषदेचे दरवर्षी आयोजन केले जाऊ लागले. भारताच्या सगळ्या प्रांतातून गायक, सितारवादक, तबलजी, बासरीवादक, नर्तक, जादूगार, नकलाकार तसेच नामांकित नाटक कंपन्या आपल्या प्रतिभेचे दर्शन लोकांपुढे करण्यासाठी मोठ्या संख्येने बडोद्यात जमा होत. कालांतराने या महोत्सवाला “बडोदा संगीत महोत्सव” म्हणून ओळखले जाऊ लागले. या महोत्सवाने होळी सणात केली जाणारी बुराई, बीभत्सना, शिवीगाळ आणि अश्लीलता तसेच अडाणी असभ्यता या सगळ्यांची जागा आता कुशल प्रतिभासंपन्न कलावंतांच्या कलेच्या सादरीकरणाच्या निखळ आनंद उपभोगण्याने घेतली.
२० फेब्रुवारी १९९६ ची अखिल भारतीय संगीत परिषद तीन दिवस चालली. लखनौचे ठाकूर नवाबअली खाँसाहेब परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेत अखिल भारतातून आलेल्या विद्वान लोकांनी भारतीय संगीत या विषयावर लिहिलेले निबंध वाचले. यामध्ये क्लेमेंटने “भारतीय संगीतातील स्वरलिपी” या विषयावरील आपला लेख वाचला. तर श्री. के. बी. देवल, आय. सी.एस यांनीही आपले लेख वाचले. या लेखांवर बौध्दीक चर्चाही झाल्या. त्याचबरोबर भारतातील दिग्गज सर्वश्रेष्ठ संगीतकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले.
या परिषदेमध्ये पं. विष्णू नारायण भातखंडे, पं. विष्णू मिरजकर (पलुसकर), उदयपूरचे फकिरूद्दीन खाँ, अल्वरचे मुजफ्फर खाँ,टोंकचे हुसेन खान, इंदूरचे इमदाद खाँ, जयपूरचे कल्लन खाँ