पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



सादर करीत असत. त्यांनी महाराजांच्या इच्छेनुसार आणि स्वतः श्रमपूर्वक आखून दिलेली शिक्षणपध्दती आज वस्तुतः सर्व संगीत विद्यालयातून शिकवली जाते. ही गोष्ट त्यांच्या कार्यसिध्दीस बळकटी आणणारी आहे.
 डॉ. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांना हिंदुस्थानी संगीताच्या शास्त्रीय व क्रियात्मक शिक्षणासाठी भातखंडेंचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी १९७१ ते १९२२ पर्यंत डॉ. रातंजनकरांची नियुक्ती बडोदा संस्थानचे विद्वान गायक मरहूम उस्ताद फैयाझ हुसेन खाँ यांच्याकडे केली होती. भातखंडेंच्या शिफारसीवरुन रातंजनकरांना सयाजीरावांकडून महिना चाळीस रुपये शिष्यवृत्ती मिळाली. महाराजांनी घातलेल्या अटींनुसार फैयाझ खाँ यांच्याकडे संगीताची तालीम आणि शाळा-कॉलेजचे पारंपरिक शिक्षण हेही चालू ठेवले. भातखंडे यांनी तयार केलेल्या स्वरलिपीचेही ज्ञान त्यांनी मिळवले.
महाराजांची भातखंडेंकडून गायनशास्त्र ग्रंथ निर्मिती

 भातखंडेंनी हिदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या वर्गीकरणाची जी थाट पद्धत विकसित केली होती आणि एक नवीन पध्दतीचे स्वरलेखन (नोटेशन) तयार केले होते, ते महाराजांनी बडोद्यात गायनशाळांतून चालविण्याची व्यवस्था केली. त्याचबरोबर महाराजांनी भातखंडे यांच्याकडून गायनशास्त्रावरील पुस्तके लिहून घेतली. या कामासाठी भातखंडेंनी बडोदा व हिंदुस्थानच्या

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / २३