पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/२०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उस्ताद फैयाज खाँ बडोद्यात, १९१५
 महाराजांनी बडोद्यात नेहमीच प्रजेसाठी नवनवीन प्रयोग केले. रुग्णांना दवाखान्यात संगीत ऐकवले तर त्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा होऊ शकेल, या विचाराने बडोद्याच्या हॉस्पिटलमध्ये फैयाज खाँना गायनाचे आदेश दिले. महाराजांच्या आदेशानुसार फैयाज खाँ रोज गायन वर्गाव्यतिरिक्त रूग्णांची गायनाने सेवाही करू लागले. संगीत कलेचा आरोग्याशी संबंध जोडून महाराजांनी एक नवे धोरण आणि सुधारणा अवलंबली होती.
 परंतु महाराजांचा हा प्रयोग फार दिवस चालला नाही. फैयाज खाँना कामाचा अधिक तान असल्याने महाराजांनी त्यांचे हे काम बंद केले. या बदल्यात त्यांना ज्युबली बागेत येणाऱ्या जनतेचे मनोरंजन करण्याचे काम सोपविले. हेच उस्ताद फैयाज खाँ पुढे हिदुस्थानात एक महान प्रसिध्द गवई म्हणून नावारूपास आले. अखिल भारतीय गायनाच्या स्पर्धेत त्यांना बरीच सुवर्णपदकेही मिळाली होती.
पंडीत विष्णू नारायण भातखंडे बडोद्यात, १९१५

 बडोदये संस्थानात मौलाबक्ष खाँची गायनशाळा व्यवस्थित चालू होती. ते दक्षिणेकडून आल्यामुळे हिंदुस्थानी संगीताशिवाय कर्नाटक संगीताचे सुद्धा त्यांना थोडे ज्ञान होते. त्यांनी स्वत:ची एक

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / २०