पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


नृत्य तसेच नाट्यकलेला देखील जतन करून त्याचे शास्त्रशुध्द अभ्यासक्रम चालू केले आणि विद्यार्थ्यांना पदवी ( Degree) आणि पदविका (Diploma Certificates) वर्ग चालू केले.

 बरेच प्रसिध्द कलावंत या संगीत विद्यालयात माजी विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य म्हणून काम पाहून गेलेले आहेत. उस्ताद मौलाबक्ष खाँ, उस्ताद फैयाज खाँ, उस्ताद अब्दुल करीम खाँ, उस्ताद अत्ता हुसैन खाँ, उस्ताद सीदिकी हुसैन खाँ, उस्ताद नसर हुसैन खाँ, उस्ताद हजरत इनायत खाँ, गायनाचार्य पंडीत मधुसूदन जोशी, पंडीत विष्णू नारायण भातखांडे, ही काही संगीत विश्वातली अजरामर नावे आहेत. ही सर्व तज्ज्ञ मंडळी एकेकाळी बडोद्यातल्या या संगीत शाळेशी जोडले गेलेले होते.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / १९