काही दिवसानंतर दरबारातून उस्ताद अब्दुल करीम खाँना
१५० रु. आणि अब्दुल हक्कला ८० रु. नियमित मिळू लागले, त्यांच्यावर दरबार गवई म्हणून 'शिक्कामोर्तब झाला. याचबरोबर राजवाड्यातील स्त्रियांना, राजपुत्रं आणि राजकन्येला गणे शिकवायचे कामही उस्ताद अब्दुल करीम खाँकडे महाराजांनी सोपविले. प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर या उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्या कन्या होत.
बडोदे संगीत महाविद्यालय (अॅग्लो व्हर्नाक्युलर शाळा), १८९६
महाराजांनी बडोद्यात सर्व जाती-धर्मांच्या मुला-मुलींसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. त्यासाठी अॅग्लो व्हर्नाक्युलर ही शाळा बांधण्यात आली. उस्ताद मौलाबक्ष खाँसाहेब यांना महाराजांचा राजाश्रय होता. महाराजांच्या 'हुकुमावरून बडोद्यात नुकतीच उस्ताद यांनी गायन शाळा सुरू केली होती. या गायनशाळेचे वर्ग नंतर या ॲग्लो व्हर्नाक्युलर शाळेत भरू लागले. २६ फेब्रुवारी १८९६ ला त्याचे संगीत महाविद्यालयात रुपांतर करण्यात आले. याचे प्राचार्य उस्ताद मौलाबक्ष खाँ साहेब होते. हे महाविद्यालय आजही हे उत्तमरित्या चालू आहे.
महाराजांनी हे संगीत महाविद्यालय कलाभवनाचा स्थापनेपूर्वी संगीत कलेला प्रोत्साहन व शास्त्रशुध्द बैठक देण्यासाठी सुरू केले होते. या संगीत महाविद्यालयामध्ये गायनाबरोबर वादन व