Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व आवाका असणारे लिखाण वाचण्याचे भाग्य मला अजून लाभलेले नाही. जर तुम्ही हा आराखडा सयाजीराव महाराजांना स्वीकारायला लावू शकलात आणि या आराखड्यावर योग्य प्रमाणात कणखर व्यक्तीच्या माध्यमातून काम करू शकलात तर तुमच्या देशबांधवांवर तुमचे असंख्य उपकार होतील. तसेच बडोदा ही भारताची बौद्धिक राजधानी बनेल.' त्यांची ही प्रतिक्रियाच या प्रबंधाचे महत्त्व विशद करते. या पार्श्वभूमीवर संस्थानातील जनतेला विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देणे, विद्यमान उद्योगांचा विकास व नवीन उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सयाजीरावांनी गज्जर यांच्या साहाय्याने १८९० मध्ये कलाभवनची स्थापना केली.
कलाभवनचे वेगळेपण
 कलाभवन ही विविध प्रकारचे तांत्रिक शिक्षण देणारी तत्कालीन भारतातील एक उत्तम पॉलीटेक्निक संस्था होती. कलाभवनमध्ये यांत्रिक अभियांत्रिकी, रंगकाम व रासायनिक तंत्रज्ञान, विणकाम तंत्रज्ञान, कला, वास्तुकला विज्ञान व व्यापारविषयक तंत्रज्ञान या ज्ञानशाखांचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. यांत्रिक अभियांत्रिकी शाखेमध्ये आकृतिबंध निर्मिती, लोहारकाम, कास्टिंग, कातकाम आणि इतर यांत्रिक उपकरणे, उष्णता, वीज, चुंबक, वाफेचे इंजिन, उपयोजित यंत्रशास्त्र, यांत्रिक तंत्रज्ञान इ. बाबींचे शिक्षण दिले जाई. या शाखेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना अभियंता व फोरमन ही करिअरची क्षेत्रे उपलब्ध

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन / ९