पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कलाभवन : स्थापनेची पार्श्वभूमी
 सुरत येथील एका प्रसिद्ध उद्योगपतीने अशा प्रकारची तंत्र शिक्षण संस्था उभारण्यासाठी आर्थिक मदत देण्याची तयारी दाखवल्यामुळे गज्जर यांनी हा प्रस्ताव तयार केला होता. दुर्दैवाने त्या उद्योगपतीचे अकस्मात निधन झाल्यामुळे ही योजना अस्तित्वात येऊ शकली नाही. त्यानंतर दोनच वर्षांनी १८८८ मध्ये गज्जर यांनी बडोदा संस्थानात नवीन शिक्षण व्यवस्थेच्या

उभारणीसाठी दिशादर्शक 'Notes on the Development of a National System of Education for the Baroda State' हा प्रबंध लिहिला. हा प्रबंध वाचल्यानंतर गज्जर यांना दिलेल्या प्रतिक्रियेत मुंबई विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू सर रेमंड वेस्ट लिहितात, 'या विषयावरील इतके मुद्देसूद, प्रमाणबद्ध, सुचक

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन / ८