पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होती. याचबरोबर विविध गिरण्या कारखान्यांचे व्यवस्थापन आणि इंजिन आणि बॉयलर यांची देखभाल करण्याचे कामदेखील या विद्यार्थ्यांना उपलब्ध होते. कलाभवनची इमारत ब्रिटिश स्थापत्यकलेवर आधारित बांधलेली आहे. वरून पाहिले की, या इमारतीचा आकार इंग्रजीमधील 'E' या अक्षरासारखा दिसतो. दोन मजली इमारतीचे दगडी बांधकाम, गोल कमानी दरवाजे, उब खिडक्या वास्तुशैलीचा उत्तम नमुना आहे. कलेचे माहेरघर असलेले भविष्याचा विचार करून भक्कम बांधकाम करून बांधले आहे. या कलाभवनात इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट, विणकाम, नाट्य-संगीत,

छायाचित्र, या विविध विषयांचे शिक्षण दिले जाई. आजही कलाभवन चांगल्या स्थितीत आहे. रासायनिक तंत्रज्ञान शाखेमध्ये रंगकाम व कपड्याच्या ब्लीचिंगचे सैद्धांतिक आणि lighting the passage of knowledg व्यावहारिक ज्ञान दिले जात होते. त्याचबरोबर इजिप्शियन शैलीचे कलिको- प्रिंटिंगदेखील शिकवले जात होते. या अभ्यासशाखेत मुख्यतः जैविक आणि अजैविक रसायनशास्त्र

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन / १०