पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विद्या व कौशल्य ही शस्त्रास्त्रे सपं ादन के ल्यावर आणि ज्ञानोद्भव असणारा आत्मविश्वास व धीर त्यांच्या अंगी उत्पन्न झाल्यावर त्यांना या छोट्या शाळे तून जगाच्या मोठ्या शाळे त सहज दाखल होता यावे.’ कलाभवनमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या नावांवर नजर टाकली असता कलाभवनच्या स्थापनेमागील सयाजीरावांचा उद्देश पूर्ण झाल्याचे स्पष्ट होते.

बडोद्याचे विद्यार्थी
 भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी चित्रपट निर्मितीचे आवश्यक प्रशिक्षण कलाभवनमध्येच घेतले होते. बडोद्याशी असणारे ऋणानुबंध विशद करताना ‘आपल्यातील कलावंत कलाभवननेच घडवल्या’चे दादासाहेब फाळकें नी स्पष्ट के ले आहे. याचबरोबर १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल मिळविणारे सी. व्ही.रामन हे देखील कलाभवनचे विद्यार्थी होते. विसाव्या शतकातील महान प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील यांनी १९४२ मध्ये पेंटींग कोर्ससाठी कलाभवनमध्ये प्रवेश घेतला होता. भारतीय डिजिटल क्रांतीचे सत्रू धार सॅम पित्रोदा यांनी १९५६ ते १९६४ अशी ८ वर्षे महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठामध्ये तांत्रिक आणि भौतिकशास्त्र विषयाचे शिक्षण घेतले. तर ‘परम’ या भारतीय बनावटीच्या महासगं णकाचे निर्माते विजय भटकर यांनी १९६६ ते १९६८ या दोन वर्षाच्या

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन / 31