पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पूर्ण खर्चाने किंवा आर्थिक मदत देऊन परदेशातील प्रगत ज्ञान आत्मसात करण्यासाठी पाठवले. १९२३ ते २४ मध्ये कलाभवच्या रासायनिक अभियांत्रिकी शाखेचे प्राध्यापक श्री. एम. श्रॉफ यांना रासायनिक अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी जर्मनी आणि युरोपमध्ये पाठविले. तर सी. एस. पटेल यांना साबण व तेल तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी बेंगलोर व म्हैसूर येथील साबण कारखान्यात प्रशिक्षणास पाठविले. याचबरोबर मगनलाल छोटालाल देसाई यांना पॅरिस येथे प्रदर्शन पाहण्यासाठी, रा. मोतीभाई भीसाभाई पटेल व रा. रावजीभाई मोतीभाई पटेल यांना इंजिनिअरिंग कामासाठी युरोपला, रा. आर. के. लुहार यांना घड्याळनिर्मिती शिकण्यासाठी, रा.एल.एच. खरादी यांना फर्निचर, लाकडी सामानासाठी, रा. आर. जे. बुधवारकर यांना चित्रकामासाठी, रा. सी. एम. श्रॉफ यांना रंगाची तत्त्वे समजावून घेण्यासाठी, डॉ.सी.एल.पटेल यांना तेल व साबूच्या निर्मितीसाठी, रा. व्ही. व्ही. वडनेरकर यांना शिल्प आणि स्थापत्यकलेसाठी इ. परदेशी पाठवले होते. परदेशातून परत आल्यानंतर त्यांनी मिळवलेले प्रगत ज्ञान कलाभवनमधील विद्यार्थ्यांसाठी फार उपयुक्त ठरत असे.
 भारताच्या तांत्रिक साक्षरतेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे कलाभवन पुढे १९४९ मध्ये कलाभवन तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी शाखा म्हणून महाराजा सयाजीराव विद्यापीठात समाविष्ट केले गेले. १५ जानेवारी, १९३४ ला संपन्न

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन / २९