Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९२० च्या दशकात भारतात विविध ठिकाणी पाश्चात्य व्यापारी धर्तीवर विकास पावलेल्या रंगकाम उद्योगाची प्रेरणा कलाभवनची रंगकाम शाखा हीच होती. बडोद्यातील बहुतांश छोट्या-मोठ्या रंगोद्योगांना आवश्यक मार्गदर्शन आणि प्रेरणा या रंगकाम शाखेनेच उपलब्ध करून दिली होती. जर्मनीहून बोलवलेल्या प्रा. शुमाकर व प्रा. इहार्ड यांच्या साहाय्याने गज्जर यांनी बडोद्यातील रासायनिक उद्योगाच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. प्रा. गज्जर यांच्या प्रयत्नातून कलाभवनमध्ये रासायनिक तंत्रज्ञान विभागाची स्थापना झाली. या तंत्रज्ञान विभागात प्रशिक्षण घेतलेले अनेक रसायनशास्त्रज्ञ संपूर्ण भारतात व भारताबाहेर विविध उद्योगांत काम करत होते. १९०७ मध्ये भारतात प्रथमच बडोद्यास 'ॲलेम्बिक केमिकल वर्क्स' हा रसायनांचा कारखाना सुरू झाला. आज गुजरात भारतातील रसायन उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. याची पायाभरणी महाराजा सयाजीरावांनी केली होती.
परदेशात प्रशिक्षण
 विविध क्षेत्रातील पायाभूत कार्याची उभारणी करणाऱ्या सयाजीरावांनी कलाभवनमधील शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आपल्या संस्थानातील अधिकारी आणि शिक्षकांनी पाश्चात्य देशांतून विशेष तांत्रिक ज्ञान आत्मसात करावे यासाठी महाराजांनी १ लाख रुपयाचा निधी राखून ठेवला होता. सयाजीरावांनी अनेकांना सरकारतर्फे

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन / २८