पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मिळून ही संख्या १०० च्या आसपास होती. कलाभवनच्या विविध विभागांच्या वर्कशॉप्स सर्व सोयींनीयुक्त असल्यामुळे बडोदा आणि बडोद्याबाहेरील विद्यार्थ्यांमध्ये कलाभवनविषयी मोठ्या प्रमाणावर कुतूहल निर्माण झाले होते. यांत्रिक अभियांत्रिकी विषयामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासंदर्भात कलाभवन पश्चिम भारतातील विविध प्रख्यात संस्थांमध्ये अग्रेसर होते. कलाभवनच्या वर्कशॉप्समध्ये विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान न देता उत्पादन आणि व्यापारविषयक प्रशिक्षण देण्यावर भर दिला जात होता.
 युरोपियन देश आणि अमेरिकेतील अनेक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना विविध उद्योगांमध्ये व्यापारी तत्त्वावर काम करून आपले तांत्रिक शिक्षण पूर्ण करता येत असे. यामुळे त्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना त्यांच्या शैक्षणिक ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात कसा वापर करता येईल हे पडताळून पाहणे शक्य होई. भारतात केवळ कलाभवनमध्ये ही पद्धत वापरली जाई. यामुळे या वर्कशॉप्सचा उत्पादनासाठीचा कारखाना म्हणूनदेखील वापर होत असे. कलाभवनच्या विविध वर्कशॉप्समध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे १०,००० रु. पेक्षा जास्त उत्पन्न मिळत असे.
 जानेवारी १९०२ मध्ये कोर्नेल विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि अमेरिकेच्या युद्ध विभागाचे विशेष कमिशनर जेरेमी डब्ल्यू. जेकस यांनी कलाभवनला भेट दिली. या भेटीनंतर ते लिहितात, “बडोदा तांत्रिक शाळेचा ( कलाभवन) उद्देश,

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन / २५