पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या वर्कशॉपच्या माध्यमातून विविध वस्तूंचे नियमित उत्पादन आणि कलाभवनमधील विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण अशी दोन्ही उद्दिष्टे पूर्ण करण्याचा सयाजीरावांचा मानस होता. त्यानुसार शाही विवाहांसाठी वापरण्यात येणाऱ्या बडोद्याच्या मध्यवर्ती भागातील नजरपागा इमारतीत कलाभवनचे वर्कशॉप चालू करण्यात आले. या वर्कशॉपमधून राज्याच्या सार्वजनिक काम, खाजगी आणि इतर विभागांना आवश्यक वस्तू त्यांच्या मागणीनुसार तयार करून दिल्या जात. त्याचवेळी कलाभवनच्या विद्यार्थ्यांना आधुनिक औद्योगिक प्रशिक्षण दिले जात होते.
 १९१९ मध्ये कलाभवनच्या वर्कशॉपमध्ये ७२ कारागीर कायमस्वरूपी कामगार म्हणून काम करत होते. कायमस्वरूपी कामगार आणि लिपिक, द्वारपाल, शिपाई इ. अन्य कामगारांची महाराजा

सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन / २४