व रासायनिक तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रमदेखील शिकवला जात होता. कलाभवनच्या या शाखेत शिकलेला विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर केवळ रंगारी न बनता रसायनशास्त्रज्ञ बनून रासायनिक उद्योगांमध्ये विविध जबाबदारीची पदे भूषवण्यास सक्षम होत असे. विणकाम तंत्रज्ञान शाखेमध्ये हातमाग आणि यंत्रमागांवर विविध प्रकारचे कापड विणण्याचे सैद्धांतिक आणि व्यावहारिक शिक्षण दिले जाई. याचबरोबर माग निर्मितीची प्रक्रियादेखील या शाखेत शिकवली जात होती. कलाभवनमध्ये विणकामाचे शिक्षण घेतलेला विद्यार्थी कापड गिरण्या आणि कारखान्यांमध्ये व्यवस्थापक आणि विणकाम तज्ज्ञ म्हणून काम करण्यास सक्षम असे.
कला शाखेत दोन अभ्यासक्रम शिकवले जात होते. प्राथमिक अभ्यासक्रमामध्ये तिसऱ्या श्रेणीपर्यंतची चित्रकला, छायाचित्रण व मॉडेलिंग शिकवले जात होते. तर उच्च अभ्यासक्रमामध्ये मातीचे नमुने तयार करणे, स्थापत्यशास्त्र, फोटोकेमिकल प्रक्रियेचे विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार अधिकचे प्रशिक्षण दि जात होते. कला शाखेत शिकलेले विद्यार्थी बडोद्यामध्ये व बडोद्याबाहेर चित्रकला शिक्षक, ड्राफ्ट्समनबरोबरच कलावंत म्हणूनदेखील काम करू शकत होते. स्थापत्य अभियांत्रिकी शाखेमध्ये बांधकाम साहित्य, बांधकाम आराखडा, इमारत बांधकाम, रस्ते बांधकाम आणि सर्वेक्षण इ. बाबींचे सैद्धांतिक आणि व्यावहारिक शिक्षण दिले जात होते. याचबरोबर सामान्य
पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन.pdf/११
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन / ११